Crime : ट्रेन मध्ये आग लागल्याची आफवा , प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी नदीत मारल्या उड्या

पुणे दिनांक २३(पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)हरिद्वार पुलावर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली व लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी ट्रेन मधून खाली उतरू लागले तर काहींनी तर गरबडीत नदी मध्येच उड्या मारल्या उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील लक्सर भागातील रायसी रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनला आग लागल्याची आफवा प्रवाशांना मध्ये एकच गोंधळ उडाला व ट्रेनच्या पायलटने बाणगंगा नदीच्या पुलावर ट्रेन थांबलवल्यांने प्रवाशी घाबरले व ट्रेन मधून खाली उतरू लागले. तर अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पुलाच्या कठाड्यावरून पळत सुटले व जीव धोक्यात घालून पूल ओलंडला .
दरम्यान या घटने बाबत रेल्वेच्या सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार. लखनऊहून चंदीगडला जाणारी एक्सप्रेस रविवारी लक्सर भागातील रायसी रेल्वे स्टेशनवर पोहोचली कोणीतरी ट्रेनची चेन ओढली ट्रेन बाणगंगा नदीच्या पुलावर थांबली व ट्रेनच्या चाकातून धुर निघू लागला . तो धुर पाहूनच सर्वाना वाटले ट्रेनलाच आग लागली व यातूनच प्रवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात भिती पसरली व काही लोक जीव वाचवण्यासाठी पुलावर उतरायला लागले तर काहींनी जणांनी दुथडी भरून वाहत होती तरी प्रवासी जीव धोक्यात घालून पूल ओलांडत होते.
दरम्यान या घटने बाबत माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहचले व ट्रेनचे ब्रेक व्यवस्थीत करून नंतर ट्रेन पुढे रवाना करण्यात आली आहे. दरम्यान ट्रेन बाणगंगा नदीच्या पुलावर एक तास ऊभी होती. काही प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी नदी मध्ये उड्या मारल्याचेही सांगण्यात येत आहे. एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.