Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचा दावा खोटा! पोलिसांकडून पिस्तूल जप्त

Sada Saravankar's claim is false : गणपती विसर्जनानंतर प्रभादेवी येथे शिवसेना व एकनाथ शिंदे गटात राडा झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या प्रायव्हेट पिस्तूल मधून गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला होता. आता या प्रकरणी दादर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल जप्त केले आहे. त्यांच्यावर आर्म अॅक्ट नुसार ही कारवाई केली आहे.
सदरच्या राड्यानंतर घटनास्थळावरून पोलिसांना एक गोळी सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर व समाधान सरवणकर या दोघा पिता-पुत्रांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समस बजावण्यात आले आहे. परंतु आमदार सदा सरवणकर यांनी आपण गोळीबार केला नाही असा दावा करत आहे. पण मात्र आमदार सरवणकर यांना हे पिस्तूल प्रकरण चांगलेच भोवणार आहे. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी चोप दिला होता. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी त्यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज केला होता. त्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने केला होता.
शनिवारी मध्ये रात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी दादर पोलीस स्टेशन मध्ये त्या आंदोलन केले होते. सदा सरवणकर यांच्याविरुद्ध आर्म अॅक्ट नुसार कारवाई कारवाई करून गुन्हा दाखल करावा म्हणून. आंदोलन केले होते. त्यानुसार घडामोडी मोडींना चांगला निघाला होता शिवसैनिकांवर लावलेले 395 कलम मागे घेऊन पाच शिवसैनिकांची तात्पुरत्या जामीनावर पोलिसांनी सुटका केली. अखेर आमदार सदा सरवणकर त्यांचा मुलगा समाधान सरवणकर. संतोष तेलवणे यांच्यासह दहा जणांवर तक्रार दाखल केली व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.