Crimes : सदाशिव पेठेत तरूणीवर भरदिवसा कोयत्याने झालेले वार mpsc. च्या या तरूणाने झेलले.

पुणे.दिनांक २८.जून ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे येथे नुकतीच दर्शना पवार च्या हत्याला काही दिवस होत नाहीत तोच दुसऱ्या घटनेची पुनरावृत्ती होता होता. तरूणाच्या सजगते मुळे राहीली. MPSC. करणाऱ्या तरूणीवर तिच्या मित्रानेच भरदिवसा सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केलेचे समोर आले आहे.
दरम्यान एक तरफी प्रेमातून या तरूणाने तरूणीवर हल्ला केल्याची माहीती समोर आली आहे.पुण्यतील सदाशिव पेठेत ही घटना घडली असून विश्रामबाग पोलीसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार सदरचा तरूण गेली अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता. मुलीला त्याच्या बरोबर फ्रेण्ड्स शिप ठेवायची नाही .असे सांगून देखील तो तिला फोनवरून धमकी दिली. या बाबत आरोपी मुलाच्या घरी सांगितले म्हणून त्यांने चिडून मुलीवर कोयत्याने हल्ला केला. सदर हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिच्या डोक्यावर टाक्के पडले असून हाताला देखिल जखम झाली आहे. या हल्ल्यात मुलीला वाचविणाऱ्या दोन तरूणाच्या हाताला देखील जखम झाली आहे. मुली बरोबर असलेला तिच्या मित्राला आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावले. होते सदर घटने बाबत मुलीने विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून पोलीसांकडून त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.