Suraj Pawar arrest : " सैराट फेम प्रिन्स " सुरज पवार ला अटक होण्याची शक्यता, मंत्रालयातील नोकरी प्रकरण भोवणार!

नोकरीचे आमिष दाखवून अहमदनगर मध्ये एकाची फसवणूक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सैराट सिनेमातील प्रिन्स संजय पवार याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे .
अहमदनगर जिल्ह्यात हा एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात नोकरीची आम्हीच दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये सैराट फेम सुरज पवार अर्थात प्रिन्स याचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे.
या फसवणूक प्रकरणी संशयंतांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे. दत्तात्रय क्षीरसागर. ( रा.नाशिक ) आकाश शिंदे व ओमकार तरटे ( दोघे.रा.संगमनेर ) अशी त्यांची नावे आहेत. मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी.५ लाख रुपयांची संशयितांनी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करून तिघांना याप्रकरणी अटक केली आहे. यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स. सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याला देखील अटक करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
महेश वाघाडकर यांनी सदर फसवणुकी प्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी. फसवणूक करणे. बनावट दस्तावेज तयार करणे. बनावट शिक्के तयार करणे. या कलमा अन्वये संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार यांना मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून फसविणाऱ्या भामट्यांना राहुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर. या प्रकरणात एक मोठे रॅकेट पुढे आले आहे. याप्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.