वानखेडे यांच्यावर होता २५ कोटींची लाच घेतल्याचा होता आरोप : समीर वानखेडे हे आर्यन खान यांच्या विरोधातील केस जिंकले!

पुणे दिनांक ८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बाॅलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती.त्यावेळेस वानखेडे यांनी आपल्या कडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप शाहरूख खान यांनी केला होता.या सर्व प्रकरणी आज न्यायालयाने म्हत्वाचा निकाल देत आर्यन खान यांच्या कडून लाच घेतल्याच्या आरोपातून वानखेडे हे निर्दोष असल्याचे सांगण्यात आले आहे.टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान याप्रकरणी सेंट्रल अॅडमिनीस्टेटिव्ह ट्रिब्युनल कॅटनं एक त्यांच्या आदेशात म्हटले आहे एनसीबीचे संचालक ज्ञानेश्वर सिंग हे काही वानखेडे यांच्यासाठी जी चोौकशी समिती नेमली होती त्या समितीचे भाग नव्हते.कारण वानखेडे यांनी जी कारवाई केली व त्यातून त्यांनी जो तपास केला त्याबाबतची संपूर्ण माहिती ही ज्ञानेश्वर सिंग यांना माहीत होती असे म्हणता येणार नाही. या प्रकरणी कारवाई करताना वानखेडे यांनी शाहरूख खान कडून २५ कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता.त्याबाबत चौकशी सुरू होती.सीबीआयने वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.त्यामधून त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.