जालना लाठीचार्ज प्रकरणी : खासदार उदयनराजेंच्या साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सातारा बंद

पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना येथे मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते.शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.या लाठीचार्ज मध्ये अनेक लहान व वयोवृद्ध महिला व पुरुष यात गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.व नंतर अनेक राजकीय नेते व पदाधिकारी यांनी व खासदार उदयनराजे यांनी आंदोलंकाची भेट घेतली.व पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणांची मागणी करणाऱ्या आंदोलंकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.सदरचा बंद हा शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.या बंदला सर्व व्यापारी व दुकानदार व नागरिक सहभागी होणार आहेत.फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे.मराठा आंदोलंका वरील लाठीचार्ज निषेधार्थ आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.आता मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व मराठा बांधवांना आज सोमवार सकाळी ९ वाजता शिवतीर्थ पोवई नाका या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.