Crime : सुरशित वाहतूकी साठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे दिनांक १९( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांनच्या सर्व प्रकारच्या सुरक्षेतेच्या दृष्टीकोणातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणा-या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सहआयुक्त संदीप कर्णिक. वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजयकुमार मगर .प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ.मितेश घट्टे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर .अतुल आदे .अदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पोलीस आयुक्त म्हणाले की विद्यार्थीचे घर ते शाळा दरम्यानच्या वाहतूक दरम्यान अपघात किंवा इतर प्रकारे जीवीतास .शारीरिक. मानसिक. धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणेकाटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बस मध्ये मदतणीस ( अटेंडन्ट ) मुलींची वाहतूक व्यवस्था होणा-या बस मध्ये महिला मदतणीस असणे बंधनकारक आहे. या बसचे वाहन चालक चांगले प्रशिक्षित असणे बंधनकारक आहे. तसेच नैतिकदुष्टया सक्षम पूर्वेतिहास चांगले असणारे असावेत .या बाबींचा खात्री शालेय परिवाहन समितीने करणे आवश्यक आहे.
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या व आदी ठिकाणी रात्रपाळीत काम करण्या-या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे जेष्ठ नागरिक तसेच सर्व प्रकारचे प्रवासी यांच्या सुरक्षिततेसाठी ऑटो रिक्षा. टॅक्सी आदींच्या तपासणी साठी पोलीस विभाग. वाहतूक शाखा.व परिवहन विभागाने संयुक्त विषेश मोहिम हाती घ्यावी अशा सुचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या वेळी दिल्या .
रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे मागणे .चो--या प्रवाशांना मारहाण तसेच अन्य प्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस नाकाबंदीच्या वेळी सर्व वाहणांची कसून तपासणी करावी नियमाचे उल्लंघन आढळलेल्या वाहनावर व चालकावर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबर प्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवणे आदी कठोरपणे पाऊले उचलावीत असे निर्देशच या वेळी देण्यात आले.या वेळी बोलताना कर्णिक म्हणाले की संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावली नुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांनच्या सुरशित वाहतुकी साठी अवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले. या वेळी मगर म्हणाले सर्व स्थानिक स्वराज्य संघटना नगरपरिषद व नगरपालिका यांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय व निमशासकिय शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी .व दर तीन महिन्यांला या संदर्भात बैठक आयोजित करून या विषयी संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करावी कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. या साठी पूर्वी पासूनच सतर्क असणे आवश्यक आहे.असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.