बीड मधील दंगली संदर्भात सदावर्तेंनी केलं होतं गंभीर वक्तव्य : जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेला गंभीर आरोप वकिल सदावर्तेना भोवणार! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंना पाठविली नोटीस

पुणे दिनांक १४ऩव्होंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल मोठे वक्तव्य करून गंभीर आरोप केले होते. हेच वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.या व्यक्तव्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी वकिल सदावर्तेना नोटीस बजावली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनला हिंसक वळण लागले होते.व बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. आमदारांची घरे जाळण्यात आली होती.व अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून देण्यात आला होता.अधिकारी व पोलिस यांची वाहनं पेटवून देण्यात आली होती.यावरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप व प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर एक मेकांवर करण्यात आले होते.राज्यात सर्वत्र या आंदोलनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकरण रंगलंय होतं व हे सर्व होत असतानाच वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता.मराठा आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला होता.या आरोपांबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक वेदप्रकाश आर्य यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांना नोटीस पाठवली आहे.व नोटीसला येणाऱ्या सात दिवसांच्या आत जेष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर माफी मांध्यमांसमोर मागावी . वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे या नोटीस मध्ये म्हण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.