आगीत ३० दुचाकी व चार ते पाच कार जळून खाक : मुंबईतील गोरेगाव मधील इमारतीला आज पहाटे 🔥 भीषण आग आगीत सात जणांचा मृत्यू ३० जखमी

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील गोरेगाव येथील समर्थ सृष्टी या इमारतीला आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये अचानक पणे 🔥 आग लागून या भीषण आगीत एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एकूण ३० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणी पोलीस सूत्र व अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मधील गोरेगाव येथील समर्थ सृष्टी या इमारतीला आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.आम्हाला या बाबत काॅल आल्या नंतर आम्ही तातडीने घटनास्थळी जाऊन 🔥 नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केला ही आग प्रचंड प्रमाणावर होती पार्किंग मध्ये एका स्टोरेज मध्ये भांड्यावर कपडे घेतलेले अनेक कपडे होते.त्यामुळे ही आग तिसऱ्या मजल्यावर पोहचली सदरच्या आगीवर तीन तासांनी नियंत्रण मिळाले आहे.या भीषण आगीत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.प्रचंड धुरामुळे अनेकांना त्रास झाल्यांने ३० जणांना रुग्णांलयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.या आगीत एकूण ३० दुचाकी व ४ ते ५ कार जळून खाक झाले आहेत.ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.