Accident in Pune : सहलीला गेलेल्या पुण्यातील बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शाळेच्या बसला अपघात झाला असून बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी व ३ शिक्षक होते. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गिरवली आयुका येथे गेली होती येताना त्रिव उतारावरून त्रीव उतार व नागमोडी वळणा मुळे बस दरीत कोसळली. या झालेल्या अपघातात सात विद्यार्थी गंभीरित्या जखमी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळ घोडा या गावातील मुक्ताई प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल ही गिरवली आयुका येथे गेली होती. या बस मध्ये एकूण ४४ विद्यार्थी व ३ शिक्षक होते. शैक्षणिक सहलीवरून परत येत असताना. एका अतिशय त्रीव अशा उतारावरुन व नागमोडी वळणा वरुन ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटल्याने सदरची बस ही दरीत कोसळली व सदरचा अपघात हा आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी झाला. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून. त्यातील सात जण हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर इतर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.