Sex Racket : पिंपरी-चिंचवडच्या दिघीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

आर्थिक फायद्यासाठी मुलींच्या अवैध वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका दलालाला अटक करून त्याच्या तावडीतून तीन मुलींची सुटका केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली आहे. जगन्नाथ उर्फ काका परशु ठोंबरे (55) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काका नावाचा दलाल ग्राहकांना मुलींची छायाचित्रे पाठवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. मोबाईलवरून फोटो पाठवून, मुलींची निवड करण्यास सांगून, दिघी, आळंदी, भोसरी परिसरात वेगवेगळी हॉटेल, लॉज बुक करून मुलींना त्या ठिकाणी रिक्षातून पाठवायचे. त्याआधारे पोलिसांनी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लॉज बुक करून त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपींच्या ताब्यातून तीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलीस पथकाने आरोपींकडून 62 हजार 590 रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 62 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात अनैतिक तस्करी कायदा १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दरिशील सोळंकी, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंत मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.