Shivaji nagar police : अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही.फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश

निष्पन्न झाले. मयताचे नातेवाईकांकडे वि·ाासात घेवून चौकशी केली असता मयत हा मित्रांसोबत बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्या मित्रांनीच त्याच घातपात केला असवा असा संशय व्यक्त केला होता.त्यामुळे पोलीसांनी त्याबाबत कसुन तपास केला तेव्हा त्याच दिवशी मयत व त्याचे मित्र हे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे परतल्या नंतर मयत व्यक्ती ही अचानक बेपत्ता झाल्याचे त्याचे मित्रांकडून समजले.
त्या नंतर तपास पथकातील रणजित फडतरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील आणि पुणे शहरातील असे सुमारे 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली.मयत इसमास वृद्ेध·ार हॉटेल,कॉग्रेस भवनसमोर,शिवाजीनगर एका अनोळखी रिक्षाचालकाने जोरात धडक दिल्याचे आणि त्याचे डोक्याचे पाठीमागील बाजुस गंभीर दुखापत झाल्याचे आढळुन आले.त्यानंतर सदर मयतास मरणास कारणीभुत झालेल्या अनोळखी रिक्षा चालकाचा व रिक्षाचा सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली.त्यामधुन रिक्षाचा क्रमांक प्राप्त झाला.त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही मधील अनोळखी रिक्षा चालकाचा फोटोद्वारे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार रुपेश वाघमारे यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,सदरचा रिक्षाचालक आरोपी हा अपघातातील रिक्षा सह खडकी रेल्वेस्टेशन जवळील रिक्षा स्टॅडवर उभा असल्याची माहीती दिली.सदरची बातमी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे कळवून त्यांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची आदेश दिले.यानंतर पोलीस अमंलदार रुपेश वाघमारे व रणजित फडतरे यांनी त्या ठिकाणी जावून खात्री करुन सदर रिक्षा चालकास आमची ओळख पटवून सदर रिक्षा चालकाने त्याचे नाव अक्षय प्रशांत चव्हाण वय 25 वर्षे रा.पवार वस्ती,विठठल रुक्मीनी मंदीर,दापोडी,पुणे असे सांगून नमुदचा अपघात त्याचे कडूनच झाला असल्याची कबुली दिली.
अशा प्रकारे वरील पोलीस पथकाच्या अथक परिश्रमातुन सदरचा शिवाजीनगर पो.स्टेशन 205/2022 भा.द.वि.कलम279,338,304(अ)सह कलम 134(ब)मो.वा.कायदा गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कामगिरी मा.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,संदीप सिंह गिल्ल,पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 मा.सतिश गोवेकर,सपोआ फरासखाना विभाग (अतिरिक्त कार्यभार विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री.अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री.विक्रम गौड, सपोनि बाजीराव नाईक, सपोनि भोलेनाथ अहीवळे,पो.अमंलदार रुपेश वाघमारे,रणजित फडतरे,अविनाश भिवरे,बशीर सय्यद गणपत वालकोळी,आदेश चलवादी,रोहीत झांबरे,तुकाराम म्हस्के,यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.