Shivshahi Bus Accident : पुण्यात शिवशाही बस व कंटेनर यांचा भीषण अपघात एक ठार तर सहा जण जखमी

पुण्यात मध्ये रात्री शिवशाही बस व कंटेनर यांच्या टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. यात एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून कंटेनर चालक व शिवशाही बसच्या वाहक व व अन्य चार जण प्रवासी हे जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत पोलीस सूत्रांच्या वतीने मिळालेली माहिती अशी की. पुण्यातील एसटी महामंडळाची बस शिवशाही व कंटेनर यांच्यात भीषण अपघात होऊन. या झालेल्या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. त्या प्रवाशांचे नाव संजय एकनाथ भायदे.( वय.५२ .रा.मुरुड ) असे आहे. कंटेनर चालक व बस वाहक असं एकूण सहा जण जखमी झाले असून. यामधील चार प्रवाशांचा सहभाग आहे. जखमींना उपचाराकरिता तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून. या अपघात एवढा भीषण होता की यात कंटेनर व शिवशाही बस यांचा याचा पुढील भागाचा चक्का चूर झाला आहे.
पुणे सासवड रोडवरील उरळी देवाची गावाजवळ रविवारी मध्ये रात्री हा अपघात झाला. उरळी येथील ट्रान्सपोर्ट से गोडवाना मधून.निघालेला कंटेनर व सासवड वरुन पुण्याच्या दिशेने येणारी पंढरपूर ते पुणे शिवशाही बस यांच्यात हा अपघात झाला. यात एक प्रवासाचा मृत्यू झाला आहे. व चालक वाहक व अन्य चार प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने एक साईडला केल्यानंतर.वाहतूक व्यावस्था पूर्व वत झाली.सदर अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.