सुदैवाने धावत्या पेटती बस थांबवून प्रवाशांना खाली उतरविले : शिवशाहीबसला परळी येथे भीषण आग संपूर्ण बस जळून खाक बस मध्ये होते २० प्रवासी सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

पुणे दिनांक २१ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड येथील आगाराची शिवशाही बस ही लातूर येथून प्रवासी घेऊन परळी येथून परभणीला जात असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक पणे मोठी 🔥 आग लागली आहे.दरम्यान शिवशाही बसला आग लागल्यानंतर चालक यांने बस थांबवून बस मधील प्रवाशांना खाली उतरविले या आगी बाबत अग्निशमन दलाला देण्यात आली.घटनास्थळी परभणी नगर परिषदेच्या तीन बंबाच्या सह्हयाने आग विझवण्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे.तो पर्यंत शिवशाही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान बस मधून प्रवासी घेऊन ही शिवशाही बस ठराविक अंतरावर गेल्यावर ही घटना परळी शहरातील मुख्य बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या वेळेस आल्या नंतर शिवशाही बसने अचानक पणे पेट घेतला याबाबत चालकाला दिसल्यावर त्यांने तातडीने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरविले. व या आगीची माहिती परळी अग्निशमन दलाला देण्यात आली.त्या नंतर घटनास्थळी तीन अग्निशमन दलाचे गाड्या दाखल झाल्या व त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यांचा प्रर्यत्न केला पण तो पर्यंत शिवशाही बसने चांगलाच पेट घेतला होता.या आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.सदरची आग ही बसच्या बॅटरीच्या स्पार्किंग मुळे झालेली माहीत मिळत आहे.दरम्यान या बसला अचानक पणे आग लागल्यानंतर या चौकात रात्रीच्या वेळी एकच गोंधळ उडाला होता.या शिवशाही बस मध्ये एकूण २० प्रवासी होते सुदैवाने त्यांना वेळीच बसमधून खाली उतरविले परंतु हे प्रवासी प्रचंड प्रमाणावर घाबरून गेले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.