छत्रपती श्रीमंत शाहू महाराज थोड्याच वेळात अंतरवली सराटीत पोहचतील : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला कोल्हापूर येथून रवाना

पुणे दिनांक ३१ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचला आहे.संपूर्ण महाराष्ट्रांतील नेते मंडळी आता अंतरवली सराटीत येत आहेत.दरम्यान यापूर्वी छत्रपती खासदार उदयनराजे व माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून ते थोड्याच वेळात अंतरवली सराटीत पोहचतील.
दरम्यान आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी साठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर पॅलेस नवीन राजवाडा येथून अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत.त्यांच्या बरोबर सकल मराठा समाजाचे वकिल बाबा इंदुलकर.दिलीप देसाई. व मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत.हर्षल सुर्वे.बाबा पार्टे.व चंद्रकांत पाटील हे देखील आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.