Shyam Manav : 'तर तुमचा दाभोळकर करू',अस म्हणत श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी.

तुमचा दाभोळकर करू,अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना देण्यात आली आहे. श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. . त्यामुळे श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते व श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकर्ते हरीश देशमुख यांनी दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. समितीने याबाबत रीतसर तक्रार नागपूर पोलिसात दाखल केली आहे. आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली.
श्याम मानव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतात. आजच्या सभेत त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला होता. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज श्याम मानव यांना धमकी आल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.