Crimes : सिंहगड पोलीसांकडून पेट्रोलिंग करतांना वीना परवाना पिस्तूल जप्त.

पुणे.दिनांक १४.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यांना आळा घालण्या.साठी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना चेकिग करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिले होते.पेट्रोलिंग करीत असतांना सिंहगड पोलीसांकडून रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराला अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काङतुस असा एकूण ४१.हजार रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तनय गुरूनाथ तोडकर ( वय.२१.राहणार नरेंद्र कॉम्प्लेक्स पलॅट नंबर ९. बेनकर वस्ती धायरी पुणे.) असे आहे सदर घटने बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती नुसार पोलीस रात्री गस्त घालीत असतांना पोलीस अंमलदार राजाभाऊ वेगरे. अमित बोङरे. अमोल पाटील. यांना सदर आरोपी संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना माहीती दिली व त्या नी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहीती देऊन चव्हाण शाळे जवळील काळूबाई मंदिर जवळ धायरी येथे संशयास्पद रित्य हलचल करणाऱ्या आरोपीची अंगझङती घेतली असता त्यांने पँटच्या आत खोसलेले पिस्तूल व दोन काङतूस असा ४१.हजार रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प आरोपीस अटक केले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परीमंङळ ३.चे सुहेल शर्मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड पोलीस स्टेशन विभाग राजेंद्र गलांडे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर.सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम. पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी. सहाय्यक पोलीस फौजदार. आबा उतेकर. पोलीस अंमलदार. संजय शिंदे.अमित बोङरे. राजाभाऊ वेगरे. विकास पांङोळे. विकास बांदल. अमोल पाटील. राहुल ओलेकर.शिवाजी क्षीरसागर. देवा चव्हाण सागर शेंडगे.दक्ष पाटील. स्वप्नील मगर. अविनाश कोंङे. यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.