Pune Police : सिंहगड रोड पोलिसांनी एक वाहन चोराला अटक करून तीन गुन्हे आणले उघडकीस

सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना. चोरीची मोटरसायकल घेऊन जाणारा एकाला अटक केली आहे. याप्रकरणी त्याने तपासात तीन ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
सिंहगड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे आमदार अविनाश कोंडे व सागर शेंडगे ही सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की एक जण चोरीची मोटरसायकल घेऊन रघुनंदन हॉल सर्विस रोड येथे उभा आहे. सदर खबरीनुसार पोलिसांनी शिवकुमार जय भीम दोडामणी. ( वय २५. रा.स.न.६५९. शिवतीर्थ नगर.बिबवेवाडी.पुणे.) याला अटक केली आहे त्याच्याकडून तपास करता त्याने सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर.१७१/२०२२.
तसेच दुसरा गुन्हा सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर.४११/२०२२. तसेच मार्केट यार्ड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर.८३/ २०२२. तिन्ही गुन्हे भा.द.वी.३७९ अंतर्गत दाखल आहेत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सदर चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. याबाबतची कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा गायकवाड सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभागाचे सुनील पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस आमदार संजय शिंदे शंकर कुंभार अमेय रसाळ विलास बांदल अमित बोडरे विकास पांडुळे राहुल ओलेकर देवा चव्हाण शिवाजी क्षीरसागर अमोल पाटील अविनाश कोंडे सागर शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.