पुणे सामाजिक सुरक्षा शाखेची कारवाई : पुणे शहरात सहा बांगलादेशी महिलांना अटक,१५ दिवसात पोलिसांची दुसरी मोठी कारवाई

पुणे दिनांक १२ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे तिथे काय उणे पुणे शहरात अनेक देशांमधून नागरिक रोजी रोटी करता येत असतात परंतु यामध्ये काही परदेशी नागरिक व महिला यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो.पण हे विदेशी नागरिक बेकायदेशीर रित्या येतात व व्यवसाय देखील बेकायदेशीर रित्या करतात पुणे सामाजिक सुरक्षा शाखेच्या पोलिसांनी आता पुणे शहरात बेकायदेशीर रित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांनवर धडक कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.पुण्यात १५ दिवसांच्या आत दुसरी मोठी कारवाई करत पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहा बांगलादेशी महिला व एक अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या महिला अनेक वर्षांपासून बेकायदेशीर रित्या पुण्यातील बुधवार पेठेत राहत होत्या.याबाबतची गुप्त बातमी पुणे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करून या बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी याच भागातून नागरिक व महिलां असे एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती.या प्रकरणी परकीय नागरिक १९७८ अन्वये फरासखाना पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशीच कारवाई पुढे देखील सुरू राहणार असल्याचे पुणे सामाजिक सुरक्षा शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.