गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींवर पुण्यातील रुग्णालयात उपचार प्रकृती चिंताजनक : शेतीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळ्यात एकावर रिव्हालवर मधून झाडल्या सहा गोळ्या

पुणे दिनांक १२ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा येथे शेतीच्या वादातून एका जणांने दुसऱ्यांवर रिव्हालवर मधून एकाच वेळी सहा गोळ्या झाडल्या आहेत.सदरची घटना ही चिंभळ्यातील हाॅटेल पन्हाळा येथे काल मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. दरम्यान या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गोळीबार करुन हल्लेखोर हा फरार झाला असून बेलवंडी पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
दरम्यान या हल्ल्या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी रात्री चिंभळ्यातील हाॅटेल पन्हाळा येथे जयदिप दत्तात्रय सुरमकर व संतोष उर्फ लाला बबन गायकवाड यांच्यात शेतावरुन वाद होता.यांच्यात चर्चा सुरू असताना ती हामरीतुमरीवर आली व यावेळी जयदिप याने स्वताकडील रिव्हालवर काढून लाला यांच्यावर फायर करत सुटला त्यावेळी लाला हा स्वताच्या बचावा करीता हाॅटेलच्या तार कंपाऊंड वरून उडी मारुन जीवाच्या आकांताने घटनास्थळावरून जवळ असलेल्या मढेवडगावच्या दिशेने मेन रोडवर पळत सुटला यावेळी जयदिप देखील त्यांच्या मागे रिव्हालवर घेऊन बेभान होऊन पळत सुटला व पाठलाग करुन एकूण सहा गोळ्या लाला यांच्यावर फायर केल्या यात लालाच्या छाती.पायावर व हात व कानाला गोळ्या लागल्या आहेत.तो या गोळीबारात गंभीर रित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या गोळीबार प्रकरणी सुनिल राजू गायकवाड यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गोळीबार करून फरार झालेल्या जयदीप दत्तात्रय सुरमकर ( राहणार.चिंभळा ) यांच्या विरुद्ध आर्म अॅक्ट व खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून.या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.मात्र या गोळीबारानंतर चिंभळा व मढेवडगावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.