Crime : चंद्रपुरात जिल्ह्यात वीज पडून सहा शेतका-यांचा मृत्यू तर नऊजण गंभीररित्या जखमी

पुणे दिनांक २७ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच वेग वेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या दुदैवी दुर्घटनेत सहा शेतकरी यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेत अन्य नऊ शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत. सदरच्या वीज कोसळण्याच्या घटना ब्रम्हापुरी. सिंदेवाही. कोरपना. गोंडापिंपरी.पोंभूर्णा. नागभीड. या भागात मुसळधार पाऊस व वीजेच्या कडकडाटासह वीजा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. २९ जुलै पर्यत या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याच्यावतीने देण्यात आला आहे.
दरम्यान शेतामधून काम घरी परतत असताना गीता ढोंगे वय ४५ यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर शेतात रोवणीचे काम करण्या-यां कल्पना झोडे व अंजना पूसतोडे या दोन महिलांचा शेतात काम करतांना वीज पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. पुरुषोत्तम परचाके या शेतक-यांचा शेतात फवारणी करतांना वीज पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. तर वनविभागात वृक्ष लागवड करतांना वनमजूर गोंविदा टेकाम यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. तर अर्चना मडावी वय २८ यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य वेग वेगळ्या भागात वीज पडून नऊजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान हवामान खात्याच्यावतीने चंद्रपूर. गडचिरोली. नागपूर. भंडारा. गोंदिया. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपुरात आज शाळा व काॅलेज यांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आदेश दिला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.या भागातील सर्वच भागातील नद्यांना महापूर आला आहे. जिवती तालुक्यातील झानेरी गावा जवळ यंत्रसामुर्गी वाहून गेली आहे.
चंद्रपुर येथील जिवती तालुक्यातील झानेरी येथे पुलाचे काम चालू असून अचानक पणे झालेल्या मुसळधार पाऊसा मुळे कामाच्या ठिकाणी असलेले तीन ट्रॅक्टर व आयजॅक मशीन .लोखंडी राॅड व सिमेंट यात वाहून गेले आहे. या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील ओढे .नाले नदी यांना विक्राळ रूप आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.