Sadhu Beaten : लहान मुलांना चोरायला आले म्हणून यूपीतील साधूना सांगलीत मारहाण प्रकरणी सहा जण अटकेत

Sangli Sadhu Beaten : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथे सध्या साधूला लक्ष करण्याच्या प्रकार घडला आहे. यापूर्वीही साधूना मारण्याच्या प्रचंड घटना घडल्या आहेत. अशातच अजून एक घटना सांगली जिल्ह्यातील जत येथे घडली. गावकऱ्यांनी साधूची टोळी ही गावातील लहान मुले चोरण्यासाठी आली म्हणून गावकऱ्यांनी साधूना बेदम मारहाण केली आहे.
सदरच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मारहाण झालेले हे चार साधू उत्तर प्रदेश मधील मथुरेत राहणाऱ्या असून ते कर्नाटक मधील विजापूर येथून पंढरपूर साठी देवदर्शनाकरिता आले होते. त्याच वेळेस गावातील लोकांनी या साधूंना मारहाण केली. परंतु हे साधू पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरिता आले होते. त्यावेळी दर्शनाकरिता जात असताना सांगलीतील जत तालुक्यामध्ये लवंगा गावात त्यांना मारहाण झाली. या साधूंनी गावातील मंदिरात मुक्काम केला होता. मंगळवारी ते पंढरपूरला जाणार होते.
एका मुलाकडे भिक्षा मागितली त्यामुळे गावातील काही स्थानिकांना ते मुलाचे अपहरण करणारे टोळीचेच आहेत असा संशय यावेळी आला. त्याच दरम्यान एका गाडीतून उतरलेल्या अन्य लोकांनी देखील या साधूंना मारहाण केली. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले असून. साधूंना मारहाण करणाऱ्या गावातील सहा स्थानिकांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणी पुढील तपास सांगली पोलीस करीत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.