मंत्र्यांच्या दबावामुळे रात्री केले निलंबित : ताथवडे येथील गॅस सिलेंडर स्फोटा प्रकरणी दोन पोलिस अधिकारीसह सहा पोलिस निलंबित

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दिनांक ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गॅस टॅकरमधून बेकायदेशीर रित्या गॅस रिफिलिंग करून त्यांचा काळाबाजार करत असतांनाच स्फोट झाला हा स्फोट झाला तिथेच या मंत्र्यांची जेएसपीएम ही शाळा आहे.आणी या स्फोटामुळे या शाळेच्या तीन बसचा 🔥 आगीत जळून खाक झाल्या मुळे या मंत्र्यांचा पारा प्रचंड प्रमाणावर चढला व पोलिस हाप्ता घेतात त्यामुळे मुळे असे बेकायदेशीर धंदे जोरात चालतात अशी आगपाखड केली.त्या नंतर रात्रीच्या वेळी या कर्मचाऱ्यांनवर निलंबनाची कारवाई तडका फडकी करण्यात आली आहे.
दरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी यांची नावं सह्हायक पोलिस निरीक्षक परवेझ शिकलगार व सह्हायक पोलिस निरीक्षक बालाजी ठाकूर व अन्य चार पोलिस कर्मचारी असे एकूण सहा जणांचा यात समावेश आहे.दरम्यान दिनांक ८ ऑक्टोबर रोजी ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेच्या ब्लाॅसम इंग्लिश स्कूल असून येथील मोकळ्या जागेत मध्यरात्रीच्या वेळेस प्रोपिलीन गॅस भरलेल्या टॅकरमधून बेकायदेशीर रित्या घरगुती व कमर्शियल सिंलेडर मध्ये गॅस रिफिलिंग करण्याचे काम सुरू असताना अचानक पणे मोठा स्फोट झाला व या स्फोटात शाळेच्या तीन स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत.या मध्ये एकूण नऊ सिलेंडरचा स्फोट झाला आहे.व अन्य एकूण २७ सिलेंडर व वजन काटा असे अन्य साहित्य घटनास्थळी सापडले आहेत.या नंतर पळून गेलेल्या चौघांवर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.तर यातील तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.तर गॅस टॅकरचा चालक अजून फरारच आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.