Crime : मणिपूर हिंसाचारांतील सहाव्या आरोपीला अटक अन्य आरोपीची शोध मोहिम सुरू. हिंसाचारात आता पर्यत १५० हून अधिक मृत्यू

पुणे दिनांक २३ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मणिपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरूच आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणात मणिपूर पोलीसांनीअन्य एकाआरोपींची धरपकड केली असून आता पर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. व अन्य आरोपींची शोधमोहिम पोलीसांन तर्फे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. अटकेत असलेले सर्व आरोपी हे तरुण असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
दरम्यान या मणिपूर पोलीसांनी ट्विटर वरून दावा केला आहे की उर्वरित आरोपींना अटक करण्या साठी मोठी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या बाबत सातत्याने छापेमारी केली जात आहे. या तरूणांनी ४ मे रोजी २ महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्या वर अत्याचार केले होते. नंतर संतप्त जमावाने यातील आरोपीचे घर जाळले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील मुख्य आरोपी हा कांगपोकपी जिल्ह्यातील बी फेनोम गावात जमावाला भडकावतांना व्हिडिओच्या चित्रफिती मध्ये दिसत आहे.
दरम्यान ज्या २ महिलांन बरोबरच ही लाजिरवाणी घटना घडली आहे. त्यातील एक महिला ही एक भारतीय लष्कराच्या माजी सैनिकांची पत्नी आहे. त्यांनी आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून काम केले आहे. व कारगील युद्धात भाग देखील घेतला होता. या घटनेचा तब्बल दोन महिन्यांनी संबंधित व्हिडिओबाबत २१ जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान पी पी आय ने या प्रकरणातील एफआयआरचा हवाला देत म्हणाले आहे की. ४ मे रोजी एका व्यक्तीची हत्या केली होती.
त्या युवकाने काही दंगाखोर लोकांना आपल्या बहिणीवर बलात्कार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. एफआयआरनुसार त्या नंतर दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि इतर लोकांसमोर त्यांच्यावर लैगिक अत्याचार करण्यात आला .मणिपूर मध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीच्या निषेधार्थ ३ मे रोजी आदिवासी एकता मार्च काढण्यात आल्या नंतर उसळलेल्या या हिंसाचारात आता पर्यंत १५०हून अधिक लोकांचा या मध्ये मृत्यू झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.