मराठा आंदोलन पेटले : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करून गाड्या पेटवल्या बंगल्यातून धुराचे लोळच लोळ निघत आहे.

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलक आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून त्यांनी माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर तुफान दगडफेक करून काचा फोडल्या व नंतर पार्किंग मधील चार चाकी व दुचाकी पेटवून दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बंगल्यातून धुराचे लोळच लोळ निघत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आज सकाळी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके हे घरी असताना आंदोलक मोठ्या संख्येने त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले व त्यांच्या बंगल्यावर तुफान दगडफेक केली व बंगाल्च्या काचा फोडल्या व पार्किंग मधील वाहनं पेटवून दिले. यावेळी आमदार म्हणाले की माझा कोणताही आंदोलकांवर राग नाही.मी मराठा समाजाच आमदार आहे.माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे.राजकीय विरोधक संधी घेत आहेत.मला आंदोलंकान बरोबर बोलण्याची संधी दिली नाही.व माझ्या बंगल्यावर तुफान दगडफेक करण्यात आली.कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्यांचा प्रर्यत्न करत आहे.व हेच माझ्या सोबत घडले आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.