धनगर समाज आरक्षण : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोक्यवर कार्यकर्तेने टाकला भंडारा

पुणे दिनांक ८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरक्षण संदर्भात सोलापूर शासकीय विश्रामगृहात निवेदन देण्यासाठी आत कार्यकर्ते गेले व त्यांनी निवेदन देऊन अचानक पणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत त्यांच्या अंगावर भंडारा टाकला आहे. या वेळी बंदोबस्ता करीता असलेल्या बांऊसर यांनी सदरच्या कार्यकर्तेला मारहाण केली आहे.त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे नाव शंकर बगाळे असं आहे.या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काल पासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दरम्यान आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात होते त्यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन त्यातील एका कार्यकर्त्याने पॅन्टच्या खिशातून भंडाऱ्यांची पुडी काढून अचानक पणे विखे पाटील यांच्या अंगावर येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा टाकत धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या अचानक पणे हे सर्व झाल्यावर विखे पाटील यांच्या बांऊसर यांनी या तरुणाला प्रचंड प्रमाणात मारहाण केली आहे.आता या प्रकरणी या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला ताब्यात घेतले आहे अशी माहिती मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.