Garba : विरारमध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू, वडिलांचाही रुग्णालयात मृत्यू

यावेळी देशभरात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. माँ नवदुर्गाची पूजा करून लोक सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करत आहेत. ठिकठिकाणी जागरण व गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरातही गेल्या शनिवारी, १ ऑक्टोबरच्या रात्री गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात लोक हसत-हसत नाचत, गात होते. यावेळी गरबा करताना ३५ वर्षीय तरुण बेशुद्ध पडला. घाईघाईत त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडिलांचाही श्वास थांबला.
मुलाच्या मृत्यूचा धक्का वडिलांना सहन झाला नाही
गरबा कार्यक्रमात उपस्थित असलेले मनीषचे वडील नरपजी सोनिग्रा (६६) यांनी मनीषसोबत रुग्णालयात धाव घेतली. मनीषला रुग्णालयात पाहताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मनीषचे वडील नरपजी सोनिग्रा यांचा मुलगा मनीषचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना हा धक्का सहन झाला नाही. हॉस्पिटलमध्ये उभे असताना नरपाजी सोनिग्रा हेही पडले आणि त्यांचाही मृत्यू झाला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.