Crime : पुणे जिल्ह्यातील आंबेगावात एस.टी.बसला अपघात

पुणे दिनांक १३ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) कल्याण डेपो येथून सकाळी भिमाशंकरला येणा-या एस.टी. महामंडळाच्या बसला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे अपघात झाला आहे. ओढ्याच्या पूला वरून ही बस २० फूट खोल असलेल्या ओढ्यात कोसळून अपघात झाला आहे.
दरम्यान या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची बस हि कल्याण डेपोची असून ती सकाळी भिमाशंकरला येत होती. सदरची एस.टी.बस हि आंबेगाव येथे आल्या वर स्मशान भूमी जवळ आसणा-या पूला वरून २० फूट खोल खड्ड्यात पडून अपघात झाला आहे. या बस मध्ये एकूण ३५ प्रवासी होते. यातील २ .जण प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने इतर प्रवाशांना कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान अपघाताची घटना सर्व साधारण सकाळी ९.३०.च्या वाजता घडली आहे. अपघातात स्थळी ५.रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.