बीड डेपोतून आज सकाळ पासून एकही फेरी नाही : काल बीड येथे आंदोलंकानी एसटी बस जाळल्याने,आज बीड मध्ये एसटी बस सेवा ठप्प

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून हे आंदोलन आता अधिक तीव्र होऊन आंदोलन पेटले आहे.दरम्यान काल मध्यरात्री बीड येथे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस जाळण्यात आली आहे.त्यानंतर आता आंदोलक हे एसटी बसला टार्गेट करत आहे.त्यामुळे आज सकाळपासून बीड येथील एसटी बस ही डेपोतून बाहेर पडलेली नाही.
दरम्यान बीड जिल्ह्यात मराठा समाजाचे आरक्षण बाबत आता मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला असुन आता या आंदोलनांची लढाई रस्त्यावर सुरु झाली आहे.सरकार विरोधात मराठा आंदोलंका मध्ये प्रचंड रोष आहे.मराठा आंदोलंकानी काल शनिवारी रात्रीच्या सुमारास धुळे -सोलापूर महामार्गावर बीड येथील महालक्ष्मी चौकात टायर जाळून महामार्ग अडविला होता.त्यानंतर अज्ञात व्यक्तीने वडगाव फाट्यावर बीड - कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस आडवून जाळण्यात आली आहे.त्याच बरोबर अन्य एसटी बसवर दगडफेक केली होती.व जाळण्यांचा प्रर्यत्न केला होता.त्यामुळे आता आंदोलंकान कडून एसटी बसला लक्ष केले जात आहे.त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता बीड डेपो मधून आज सकाळ पासून एकही बस बाहेर पडलेली नाही.त्यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका बसत आहे.दरम्यान बीडमधील एकूण आठ आगार आहेत पण या आगारातून एकही एसटी बस बाहेर रोडवर आलेली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.