Crime : लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांना निर्भय विद्यार्थी अभियान च्या माध्यमातून पोलीस दीदी व पोलीस काकांची साथ

पुणे दिनांक १३.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) पुणे शहरातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी आपल्या अभ्यासावर फोकस करावा त्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येतांना व क्लासला जाताना. तसेच घरी जातांना रोड रोमिओ यांचा त्रास पूर्णंपणे आटोक्यात यावा म्हणून अशा प्रकारच्या घटना पोलीसां मध्ये कळवा या हेतूने पोलीस आयुक्त पुणे रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात निर्भय अभियानच्या सूचना दिल्या नंतर. रोड रोमिओ व टवाळखोर कडून मुलींना हैणारा त्रास वेळीच पोलीस यांना कळविला तर .त्या वर उपाययोजना करून या मधून होणा-या स॔भाव्य गंभीर घटना टाळण्यासाठी प्रतेक शाळा व महाविद्यालयात पोलीस स्टेशन समितीच्या वतीने एक नोडल अधिकारी व पोलीस दीदी व पोलीस काका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान दिनांक १२जुलै रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने लेक्सिकन स्कूल वाघोली येथे पुणे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा महाविध्यालयातील प्राचार्य व शिक्षक यांची बैठक घेण्यात आली .सदर बैठकीत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्र्वजित काइंगडे यांनी प्रतेक शाळा व महाविद्यालयात नेमण्यात आलेल्या पोलीस दीदी व पोलीस काका .यांची माहिती शिक्षक व प्राचार्य यांना माहिती दिली आहे.
या बाबतची सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना देण्यात यावी.व शिक्षकांनी शाळा भरण्याच्या आधी व सुटण्याच्या आधी कोणी गेटच्या बाहेर टवाळखोर मुले थांबली आहे का.अगर कसे हे पाहून पोलीसांना सांगावे या संदर्भात विनंती केली आहे. तसेच पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत जी मोहिम राबविण्यात येत आहे. या मध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थी पर्यंत व्यसनांचे होणारे भयंकर परिणाम समजावून सांगण्या साठी विद्यार्थी यांना एकत्र करून पोलीस व व्यसनमुक्ती वर काम करणा-या स्वयंसेवी संस्था यांना पाचारण करून व्यसना पासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगण-या साठी सेमिनार आयोजित करणे संदर्भात आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार .सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा. पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे .सहाय्यक पोलीस उपयुक्त संजय पाटील लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्र्वजित काइंगडे. गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील .पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सीमा ढाकणे .लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस दीदी व पोलीस काकां व लेक्सिकन स्कूलचे श्रीमती अंजु लुथ्रा.श्रीमती पेट्रोलिना इट्ज .अमोल लोखंडे. तसेच एकूण ७२.शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.