Crime : भीमा कोरेगाव प्रकरणात वर्नोन गोंजल्विस व अरूण फरेरा दोघांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

पुणे दिनांक २८ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भीमा कोरेगाव प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणांतील आरोपी वर्नोन गोंजल्विस व अरूण फरेरा यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या पूर्वी उच्च न्यायालयाने या दोघांना जामीन नाकरला होता. त्या नंतर या दोघांनी जामीन साठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणांशी संबंध जोडत पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या वर गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ४ वर्षांन पूर्वी ठाणे येथून अरूण फरेरा व अंधेरी एमआयडीसी येथून वर्नोन गोंजल्विस या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नुसार त्यांच्या वर कारवाई करण्यात आली होती.पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणांशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या वर गुन्हे दाखल केले होते २८ ऑगस्ट रोजी या कार्यकर्ते यांना अटक केली व नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. हे सर्व कार्यकर्ते हे डावे आहेत व माओवादी विचारांकडे त्यांचा कल आहे. असा या दोघांवर आरोप आहे. मोदी सरकारवर ते टिका करत आले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.