Crime : मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला बजावली नोटीस

पुणे दिनांक २२जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी सगळेच मोदी कसे चोर असतात .असे वक्तव्य केले होते. या वक्तव्या नंतर भाजपच्या तक्रारी वरून हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे गुजरातच्या सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती या निर्णया विरुद्ध काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुजरातस सरकार व आमदार पुर्णेश मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात मोदी आडनाव प्रकरणी न्यायमूर्ती बी.आर.गवई व न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर समोर राहुल गांधीच्या याचीकेवर सुनावणी झाली. १५जुलै रोजी राहुल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती १८ जुलै रोजी मान्य केली . त्यांच्या आधी पुर्णेश मोदी यांनी देखील धाव घेउन त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय या प्रकरणात निर्णय घेऊ नये.
असे आवाहन केले होते. राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते २०३१पर्यंत कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. शिक्षा पूर्ण झाल्या नंतर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी आहे. असा नियम आहे. या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा व त्या नंतर ६ वर्षांची शिक्षा २०३१ मध्ये पूर्णं होईल. व मानहाणीच्या प्रकरणात २३ मार्च २०२३ रोजी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. व न्यायालयाच्या या निर्णया नंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली होती. या निर्णया विरुद्ध राहुल गांधी हे उच्च न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.