Defrauding hotel management students : परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट देण्याचे अमिष दाखवुन हॉटेल मॅनेजमेंटच्या विदयार्थांची 4,50,000 रूपयेची आर्थिक फसवणुक करणाया आरोपींना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 219/2022 भारतीय दंडविधान संहिता कलम 406, 420, 504, 34 प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी व त्यांचे मित्र यांना माहे मार्च 2021 पासुन ते आज पावेतो सक्सेस करियर कन्सलटन्सीचे तसेच आरोपी जितेश विलास जाधव वय 40 वर्षे रा.वागळे इस्टेट, ठाणे वेस्ट व राधेशाम मंगळू महाराणा वय 46 वर्षे रा. अनुराधा बिल्डींग, नागरी निवारा परिसर, गोरेगाव ईस्ट, मुंबई यांनी संगणमत करून परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट न देवुन तसेच त्यांची स्वीकारलेली रक्कम देखील परत न करून त्यांची एकत्रितरित्या एकुण 4,50,000/- रूपयेची फसवणुक करून फिर्यादी व त्यांचे नमुद मित्रांना शिवीगाळ केली.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये श्री. राजेंद्र डहाळे,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री.सागर पाटील,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 02, पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक,स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाने श्री. अशोक इंदलकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री. सोमनाथ जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे),स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेनुसार पोलीस उप निरीक्षक तुषार भोसले, व स्टाफ यांचे पथकाने नमुद आरोपींच्या ठावठिकाण्यांची माहिती काढुन नमुद आरोपींना वेगवेगळया ठिकाणाहुन सापळा रचुन ताब्यात घेतले असता, त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर येथे आणुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.राजेंद्र डहाळे,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर,मा. सागर पाटील पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 02, पुणे शहर, मा. सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक, स्वारगेट विभाग, पुणे शहर, मा.श्री. अशोक इंदलकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर,मा.श्री. सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे),स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, धिरज पवार व संदीप घुले सर्व नेमणुक स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व मंगेश बोहाडे नेमणुक परिमंडळ 02 कार्यालय, पुणे शहर यांचे पथकाने केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.