चोरलेले ३१ मोबाईल ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे : गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मोबाईल चोरट्यांच्या मुंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात आता सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.व याताच मंडाळाचे देखावे पाहण्यासाठी व गणेश बाप्पाचे दर्शन करण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी आहे.व याचाच फायदा घेत चोरटे देखील सक्रिय झाले आहेत.मुंढवा पोलिस एक जुन्या गुन्ह्यातील मोबाईल चोराचा तपास करीत असताना त्यांना एक इसम चोरीचे मोबाईल विक्री करीता मुंढवा भागात येत असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.व त्याच्या कडून चोरलेले एकूण ३१ मोबाईल एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव सतिश देवा हिरेकेरुर ( वय ३६ रा.टाटा सोसायटी स.नं.७५ विकास नगर घोरपडी पुणे.) असे आहे.याच्या विरुद्ध मुंढवा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३१६/ २०२३ मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता व या प्रकरणी मुंढवा पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या आदेशानुसार तपास करीत असतांना चोरी करुन आणलेला एकजण मुंढवा येथे मोबाईल विक्री करण्या साठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपिीला अटक करून त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचे एकूण ३१ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अंमलदार दिनेश भादुर्गु.महेश पाठक.यांनी केली आहे.सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजनकुमार शर्मा. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख.सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती आश्र्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे.पोलिस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे.तपास पथकांचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.