बुलढाणा जिल्ह्यातील मोठी दुर्घटना मध्यप्रदेशातील मजूरांवर काळाचा घाला : झोपेत असलेल्या दहा मजुरांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू सहाजण गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गवर खामगाव मलकापूर जवळील वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.सदरच्या अपघातात दमून महामार्गाच्या बाजूला झोपलेल्या मजूरांना ट्रकने चिरडले आहे.अपघातात चार मजूरांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे.तर सहाजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमी झालेल्या मजूरांना तातडीने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.अपघता नंतर संपूर्ण रोडवर रक्ताच रक्तं पडले आहे.या अपघाता नंतर या घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हे मजूर मध्यप्रदेशातील असून महामार्गाच्या कामा निमित्त आले होते.आज पहाटे साडेपाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात मयत झालेल्या मजूरांची नावे १) प्रकाश धांडेकर,२) पंकज जांभेकर.३) अभिषेक जांभेकर.अशी नावे आहेत.तर चौथ्या मजूराची अद्याप ओळख पटली नाही.अपघाताची माहिती नागरिकांना समजल्या नंतर त्यांनी घटना स्थळावरुन मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.पोलिसांनी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून ते महामार्गाच्या कामा निमित्त आले होते.मलकापूर जवळील वडनेर भोलजी येथे काम चालू होते.काम संपल्यावर दमून ते महामार्गाच्या बाजूला झोपलेल्या अवस्थेत असताना भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना पहाटे चिरडले.यात तीन जणांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.यात सहा मजूर गंभीर रित्या जखमी झाले असून.तिंघा जणांची प्रकृती गंभीर आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.