कारमधील सात जणांचा मृत्यू : ट्रक व कारचा भीषण अपघात कारचा संपूर्ण चुराडा सात जणांचा मृत्यू

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कर्नाटकातील गुडाच्या जंगला जवळील महामार्गावर ट्रक व कार यांच्याच धडक होऊन भीषण अपघात झाला असून कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गवर भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पाठीमागून कारला जोरात धडक दिल्याने या भीषण अपघाता मध्ये कारचा संपूर्ण चुराडा झाला आहे.या भीषण अशा अपघात कार मधील एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यात तीन महिला व एक लहान मुलीचा समावेश आहे.
दरम्यान या अपघात प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारला पाठीमागून धडक देणारा ट्रक हा चित्रदुर्गा येथून होस्पेटला जात होता दरम्यान भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरिंग लाॅक झाले यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेच्या लेन मध्ये घुसला व एसयउव्हई कारला धडक दिली.या दरम्यान झालेल्या अपघातात कार मधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी हे हरपनहल्ली तालुक्यातील कुलाली मंदिरात देवदर्शन गेले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.