Crimes : भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठकसेनने २८.लाख रूपायांची युवकांची केली फसवणूक.

पुणे.दिनांक २३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम. )भारतीय सैन्य दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकूण १३ .युवकांची फसवणूक करण्यात आल्याची खळबळ जणक घटना पुण्यात घडली असून या ठकसेनने बेरोजगार युवकांची आता पर्यंत एकूण ४६.लाख रूपायांची फसवणूक केल्याबद्दल प्रथम दर्शनी माहीती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.फसवणूक प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये या ठकसेन विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या ठकसेन चे नाव प्रमोद भीमराव यादव ( वय २७.राहणार. कोंढवा पुणे. ) असे आहे. सदरच्या फसवणूकी बाबत राहूल अशोक बच्चाव ( राहणार. श्रीराम नगर नाशिक ) यांनी रितसर कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. राहूल हा भारतीय सैन्य दलात भरती होण्या करीता प्रयत्न करीत होता. योगा योगाने त्याची प्रमोद या ठकसेन बरोबर ओळख झाली .त्या वेळेस ठकसेन प्रमोद याने आर्मीचा युनिफॉर्म घातला होता.तुला मी भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून राहूल कडून वेळो वेळी पैसे घेतले. त्या वेळेस राहूलने परीक्षा बाबत विचारणा केली असता.तुला यावा लागेल व तयारी करावी लागेल असे त्याला खोटंच सांगण्यात आले.
यादव हा ठकसेन मूळचा राहणारा नाशिकचा असून तो गेली काही दिवसांपासून कोंढवा येथे राहतो. तिथेच राहूलला घरी बोलावून त्या वेळेस त्याने आपल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ओळख असल्याचे सांगितले. या ठकसेनने अनेक बेरोजगार युवकांना नोकरी लावतो म्हणून चुना लावल्यचे समजत आहे. एकंदरित एकूण १००.च्या आसपास ही संख्या असू शकते?.राहूलचा विश्वास बसण्या करिता त्यांने आर्मी च्या गणवेश घातलेले एकूण ८.बोगस अधिकारी उभे केले होते. हा सर्व प्रकार सप्टेंबर २०२२.पासून १८.जून पर्यंत चालू होता. याच दरम्यान या ठकसेनने राहूल कडून एकूण २८.लाख ८८.हजार रूपये उकळले होते. एवढे पैसे देऊन पण काम होत नसल्या बद्दल आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. व त्याने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.या प्रकरणी कोंढवा पोलीस तपास करीत आहेत. ज्या बेरोजगार युवकांची फसवणूक झाली ते सर्व ग्रामीण भागातील आहेत. सातारा. नाशिक. धुळे.औरंगाबाद. येथील आहेत. युवकांची फसवणूक करणारा ठकसेनने एक शक्कल लढवून युवकांना तुमचे आर्मी मध्ये सिलेक्शन झाले असे खोटे सांगून खोटी बनावट यादी युवकांना देत असत या ठकसेनने आता पर्यंत बेरोजगार युवकांना ४६.लाख रूपायांचा चूना लावला. हा आकडा जास्त देखील असू.शकतो. असे सूत्रांचे म्हणणे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.