आज महाराष्ट्रभर मराठा समाज आरक्षणा साठी उतरणार रस्त्यावर : मराठा आरक्षणकरीता शिंदे सरकारला दिलेली ४० दिवसांचा कालावधी संपला आज ११ वाजता आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्या संदर्भात ठाम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला ४० दिवस दिले होते.त्याची डेडलाइन आज संपली असून आज ११ वाजता आंतरवाली सराटीत ते पत्रकार परिषद घेणार आहेत.व आजपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.तसेच आजपासून सर्व आमदार व खासदार व सर्वच पक्षांच्या नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कळकळीची विनंती केली आहे की मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये.आरक्षणासाठी सोबत येऊन लढावे पण आरक्षणासाठी आत्महत्या करु नये.हे सरकार आरक्षण कसे देत नाही ते आम्ही पाहू पण तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही ऊभे रहा.आपली माणसं कमी होता नये.आजपासून आमरण उपोषण सुरू केले जाणार असून या उपोषण दरम्यान उपचार व पाणी देखील घेतले जाणार नाही.आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले असून.त्यांनी यापूर्वीच राज्य सरकारला सांगितले होते की २४ ऑक्टोबर नंतर हे आंदोलन सरकारला परवडणारे नाही.व आता त्याची सुरुवात आज पहाटे पासून पुणे येथून झालेली आहे.आज पहाटे चार वाजल्यापासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाकण एमआयडीसी मध्ये जाणाऱ्या कामगांरांच्या बसेस चांडोली येथील टोलनाक्यावर अडविण्यात आल्या आहेत.आता मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झाला असून तो आता महाराष्ट्राच्या रोडवर मोठ्या प्रमाणावर उतरला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.