7 dead bodies found in the riverbed : पारगाव येथील नदी पात्रात सापडलेले ७ मृतदेह आत्महत्या नसून करणीच्या वादातून त्यांचा खूनच

पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक तपासात हे सर्व बुडून मृत्यू झाल्याचे दिसत असून पोलीस याचा तपास केला असता करणी प्रकरणी हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोहन पवार त्यांच्या कुटूंबासह भीमा नदीत सापडले. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता. तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. त्याच्यातून हत्या झाली.
त्यामुळे धनंजय पवार यांच्या कुटूंबाने कट रचला. मोहन पवार यांच्या कुटूंबाला यवत परत आणलं. आणि त्यानंतर रात्री जवळपास साडेबारा एकवाजेच्या सुमारास यांना गळा दाबून मारण्यात आलं. त्यानंतर भीमा नदीत फेकण्यात आलं. इतकेच नव्हे तर त्यामध्ये तीन मुलं देखील आहेत. झोपलेल्या अवस्थेतच ७ जणांची हत्या करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांची पथके तपासासाठी रवाना केली. दरम्यान, रविवारी सापडलेल्या मृतदेहाजवळ एक चावी सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले, तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आणि सोन्याची खरेदीची पावती सापडली. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नदीपात्रात सापडलेल्या चार मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या सर्वांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. चारही मृतदेहांवर जखमा नसल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
मोहन उत्तम पवार (४८), संगीता मोहन पवार (४५), त्यांची मुलगी राणी शाम फुलवारे (२५), जावई शाम फुलवारे (२८), आणि त्यांची तीन मुले रितेश उर्फ भैय्या शामराव फुलवारे (७), छोटू फुलवारे. (५) आणि कृष्णा (३) अशी मृतांची नावे आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.