Accused arrested : खून आणि खूुनाचा प्रयत्न अशा दोन गुन्हयांत पाहिजे असलेला सराईत आरोपी जेरबंद

१७ ऑक्टोबर २०२२ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचे सुचनेनुसार तपास पथकातील पोलीस उप-निरिक्षक,चंद्रकांत कामठे व त्यांचा स्टाफ असे दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच पाहिजे व फरार आरोपी यांचा शोध घेणेकामी गस्त घालत असताना,दत्तवाडी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे व प्रशांत शिंदे यांना त्यांचे खास बातमीदांरामार्फतीने बातमी मिळाली की, ‘सिंहगड रोड पो.स्टे. येथील सराईत गुन्हेगार सनी चव्हाण याचे वाढदिवसां दिवशी झालेल्या खुन प्रकरणातील पाहिजे आरोपी तसेच दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीतील दि.09/10/2022 रोजी पानमळा सिंहगड रोड येथील कृष्णकुमार चांदणे,रा.पानमळा,पुणे याचे खुनाचे प्रयत्नाच्या गुन्हयांत पाहिजे फरार असलेला सराईत गुन्हेगार प्रविण ऊर्फ घाया चंद्रकांत खांबे हा त्याच्या मित्रास भेटणेकामी महालक्ष्मी मंदीर शिवदर्शन परीसरात येणार आहे. सदर बातमीचे अनुशंगाने सापळा रचुन प्रविण ऊर्फ घाया चंद्रकांत खांबे,रा.दांडेकर पुल,पुणे या आरोपीस पळुन जाताना कौशल्याने ताब्यात घेण्यात आले.
त्याचेकडे तपास करता त्याने पुर्ववैमनस्यातुन दि.09/10/2022 रोजी इसम कृष्णकुमार संजय चांदणे, रा.पानमळा,पुणे याला त्याचे दोन साथीदारांसह डोक्या मध्ये मारुन जखमी केले होते. त्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाणे सदर दिवशी गुन्हा रजि.नंबर 234/2022,भा.द.वि.कलम 307,323,504,34 अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच दि.25/09/2022 दिवशी सिंहगड पोलीस ठाणे हद्दीत डी.एस.के.स्कुल जवळ सराईत गुन्हेगार सनी चव्हाण याच्या वाढदिवसांची पार्टी पाहत असताना,त्यांचेमध्ये झालेल्या सुकल मसराम याच्या खुन प्रकराणात सुध्दा पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असुन,त्याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाणे गु.रजि. नं.419/2022 भा.द.वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपी प्रविण ऊर्फ घाया खांबे हा पुणे पोलीसांचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वीही सन 2014 मध्ये वडगाव भागात एकाचे अपहरण करुन भोर वरंधा घाट येथे खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे केल्यापासुन आरोपी त्याचे मुळ गावी महाड येथे लपुन बसला होता. परंतु पुण्यात मित्राला भेटायला आल्यावर त्याला अटक करण्यात आली असुन,सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उप- निरीक्षक,सुनिल जगदाळे हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशीक विभाग,मा.राजेद्र डाहाळे,पोलीस उप-आयुक्त,परि.3 मा.श्रीमती.पौर्णिमा गायकवाड, सहा.पोलीस आयुक्त,सिंहगड विभाग,श्री. सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,अभय महाजन व पोलीस निरिक्षक,(गुन्हे),विजय खोमणे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक,चंद्रकांत कामठे, सुनिल जगदाळे, पो.हवा. कुंदन शिंदे, पो अं प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, सद्दाम शेख, नवनाथ भोसले, श्रीकांत शिंदे, किशोर वळे, दयानंद तेलंगे पाटील, अमोल दबडे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.