मुंबईत खोटा काॅल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ.आरोपीच्या दिल्लीतून आवळल्या मुसक्या : मुंबईतील ताज हॉटेल मध्ये बाॅम्ब ठेवल्याचा खोटा काॅल करण्याऱ्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खोटा काॅल करून पोलिस खात्याची झोपच अज्ञातांनी उडवली आहे.यात कोण मद्यपान करून फोन करतो आमूक ठिकाणी बाॅम्ब ठेवला . अशीच घटना पुन्हा एकदा मुंबईत घडली आहे.मुंबईतील प्रसिद्ध व मोठे हाॅटेल ताज मध्ये बाॅम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या काॅलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.आता या युवकाने हा काॅल का केला याबाबतचा तपास पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान काल १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोल रूम मध्ये फोन करून ताज हॉटेल मध्ये बाॅम्ब ठेवल्याचा म्हटले व ताज हॉटेल हाॅटेल मध्ये बाॅम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करा.असे सांगितले.यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.तात्काळ पोलिस व बाॅम्ब शोधक व नाशक पथक ताज हॉटेल मध्ये जाऊन तपासणी केली.मात्र एक तास सर्वत्र कसून तपासणी केली परंतु यात काहीच निष्पन्न झाले नाही.नंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला.याबाबत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्याचे नाव धरमपाल सिंह ( वय ३६ ) असे आहे.तो दिल्ली येथील लक्ष्मी नगर येथील रहिवासी आहे.दरम्यान या व्यक्तीने फायर ब्रिगेडला काॅल करण्यापूर्वी मुंबई पोलिस कंट्रोल मध्ये तब्बल २८ वेळा काॅल केल्याचे काॅल केल्याचे दिसून आले आहे.मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी या काॅलरवर आयपीसी कलम ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.या काॅलरला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.याने फोन का केला याबाबतचा शोध कुलाबा पोलिस घेत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.