ईमेल करुन मागितली होती ४०० कोटींची खंडणी : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपींच्या मुंबई पोलिसांनी तेलंगणातून आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा ईमेल करणाऱ्यांच्या मुंबई पोलिस यांनी तेलागंणातून मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत चार वेळा ईमेल करुन ४०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.व खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी.
दरम्यान आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव . गणेश रमेश वानपारधी ( वय १९ रा.तेलागंणा) असे आहे .त्याला न्यायालयाने ८ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.धमकी देताना त्यांने स्वतःचे नाव शादाब खान असे सांगितले आहे.याच्या विरोधात गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये आय पी सीचे कलम ३८७ व ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबबात तपास करताना ईमेलवरुन धमकी देणाऱ्यांचे लोकेशन तेलागंणातून दाखवत होते.त्यानुसार मुंबई पोलिसांनी गणेश वानपारधी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.