Pune crime : अवैध गुटखा वाहतूक करणाया खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

दिनांक 10/11/2022 रोजी खंडणी विरोधी पथक 1 कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन गाड¬ांमधून बंदी असलेला गुटख्याची वाहतूक केली जात असून सदरच्या गाड्या शिवाजीनगर कोर्टाच्या मागील बाजूस कॅनरा बँकेच्या जवळ उभ्या आहेत.
प्राप्त बातमी वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशियत गाडी इट्रिगा व व्हॅगनार या गाड्या ताब्यात घेवुन महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला केशरयुक्त विमल पान मसाला,तंबाखू असा एकूण 5 लाख 4 हजार रूपयांचा सुगंधित गुटखा/तंबाखू व सदरच्या देान्ही गाड¬ा असा एकूण 18 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याप्रमाणे इसम नामे संजय हनुमंत ओरसे, वय 35 वर्षे, राहणार जनवाडी, पुणे व विनोद जयवंत ढोले, वय 39 वर्षे, रा. सदर यांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. 171/2022 भादवि कलम 188,272,273,328,34 अन्न सुरक्षा कायदा प्राव्ही. अॅण्ड रिस्ट्री. नियमन 2.3.4 चे सह वाचन 3 (क्ष्) झ्झ् अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोंउनि विकास जाधव, खंडणी विरोधी पथक 1,गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता,मा.पोलीस सह-आयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे,गुन्हे शाखा,पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त, श्री.श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा पुणे शहर, मा.सहायक पोलीस आयुक्त -1, गुन्हे शाखा, श्री.गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारेे, सपोनि अभिजीत पाटील, पोउनि विकास जाधव, पोलीस अंमलदार संजय भापकर, प्रविण ढमाळ, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.