Crimes : अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखा पथकाने मुंढव्यात छापेमारी करून साडे४६ लाखांचा चरस जप्त चौघे जण गजाआड

पुणे दिनांक १६ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने गुन्हे शाखा पुणे शहर यांनी मुंढव्यातील पोलिस स्टेशन हद्दीत छापेमारी करून होंडा सव्हिर्सेस शोरुम लोणकर वस्ती या ठिकाणी दोंघेजण व एक महिला व पुरुष व अन्य दोघेजण यांना पकडून त्यांच्याकडून एकूण ४६ लाख ५९ हजार रूपयांचा एम.डी.कोकेन व चरस जप्त करण्यात आला आहे. व चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे या प्रमाणे आहेत १) सागर कैलास भोसले ( वय २६.रा.फ्लॅट नं.६.शितोळे बिल्डिंग शंकरनगर खराडी पुणे) २) एक महिला ३) अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया ( वय ४०रा.फ्लॅट नं.३०४ गुडविल ऑरचिड धानोरी पुणे) ४) इम्ररीन गॅरी ग्रीन ( वय ३७ या.बंगला नं २१ए.खेसे पार्क लोहगाव रोड पुणे) अशी त्यांची नावे आहेत.यांच्याकडून मेफे ड्राॅन एम डी.व कोकेन असा अंमली पदार्थ एकूण ४६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या विरुद्ध मुंढवा पोलिस स्टेशन मध्ये गु.र.नं.२७६/ २०२३ एन.डी.पी.एस.अॅकट कलम ८ (क)२१(ब) २२(क) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळ हे करीत आहेत.
दरम्यान याप्रकरणी सदर कारवाई पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार.सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे.पोलिस उप-आयुक्त अमोल झेंडे.सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे.यांच्या मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड व सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे .व अन्य कर्मचारी यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.