मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र : उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा आंदोलन सुरूच राहणार

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या वतीने उपोषणला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की.वंशावळीचे दस्तावेज अनेकांकडे नाहीत.त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होणार नाही.मराठा सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्र द्यावीत.व वंशावळ दस्ताऐवज या ऐवजी सरसकट मराठा असा बदल करा अशी मागणी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान आज सकाळी पत्रकार परिषदेत अंतरवाली सराटी गावात उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की.मी उपोषण सुरूच ठेवणार.फक्त पाणी घेणार व सलाईन लावणार आहे.असे यांनी आज स्पष्ट केले आहे.तसेच सरकारने काढलेला जीआर आमच्या फायद्याचा नाही.आमच्याकडे निजामशाही कालखंडा मधील वंशावळ नाही.दरम्यान तेलंगणा राज्यात मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणूनच नोंद आहे.त्यामुळे आम्हाला त्याच आधारावर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.अशी मागणी त्यांनी केली आहे.व पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारने काम केले आहे.मी त्यांचा आभारी आहे.परंतू फक्त सरकारने वंशावळ ही अट काढून सरसकट मराठा कुणबी असा उल्लेख करावा अशी मागणी केली आहे.ते म्हणले की गेली ७० वर्षांपासूनची मराठा समाजाची आरक्षणची मागणी आहे.ती या मायबाप सरकारने पूर्ण करावी आम्ही सरकारचे आभार मानू व लाखो मराठा समाजाच्या नागरिकांचा सरकारला आशिर्वाद सरकारला मिळेल असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या नागरिकांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले की शांततेत आंदोलन करा व लोकशाही मार्गाने आंदोलन करा कुठं ही हिंसाचार होणार याची दक्षता घ्या असे ते म्हणाले. दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की.गावात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या घटनेत गावातील अनेक वयोवृद्ध व नागरिक व महिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत काहीजण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.आम्ही राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांना विनंती केली आहे.असे ते यावेळी म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.