नागपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई : प्रायव्हेट पार्टमध्ये सोन्याची दोन किलो पेस्ट लपवून आणणाऱ्या दोंघाजणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सोने तस्कर हे तस्करी करण्यासाठी काय फंडा वापरतील हे सांगता येत नाही.आज पहाटे नागपूर येथील आंतरराष्ट्रीय आंबेडकर विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दोन युवकांनी दुबई येथून चक्क आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन किलो सोन्याची पेस्ट लपवून आणली या प्रकरणी या दोन युवकांच्या संशयास्पद हालचाली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटल्यानाही या अधिकाऱ्यांनी त्यांची अंगझडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.या दोंघाजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे १) शाहीद नालबंद ( रा.कर्नाटक ) २ ) पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर ( रा.कर्नाटक ) अशी आहेत या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण दुबई येथून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या वतीने मंगळवारी पहाटे विमानतळावर अधिकांऱ्यांनी लक्ष केंद्रित केले होते.व सावंजाची वाट पाहत होते.कतार वरुन आले होते.तपासणी दरम्यान त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये दोन किलो सोन्याची पेस्ट लपवून आणली होती.पोलिसांनी त्यांच्या कडून आणलेली सोन्याची पेस्ट जप्त करून दोंघा अटक केली आहे. दरम्यान सोने तस्कर काय काय फंडा वापरतील हे अजब आहे.त्यामुळे आता सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील अशा सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींवर चांगलीच करडी नजर ठेवावी लागणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.