सर्वात अधिक मराठा समाज हा बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमक : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात मराठा आरक्षणांचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर पेटला आहे. मराठा आंदोलक हे सत्ताधारी नेत्यांवर जास्त नाराज झाले आहेत. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.अनेक ठिकाणी साखळी उपोषणा सुरू केले आहे.शहरापेक्षा ग्रामीण भागातील तरुण पिढी ही जास्त आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.बीड जिल्ह्यातील धारुर येथे मराठा आरक्षण प्रश्र्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला आहे.व मराठा आरक्षण संदर्भात सरकार निर्णय घेत नसल्याने धारुर येथील मराठा बांधव प्रचंड आक्रमक झाले आहेत.यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बीड जिल्हा येथील धारुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी मराठा आंदोलंकानी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं , एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाबाजी करण्यात आली या प्रतीत्तामक अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.