१० वाजता मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर पोहोचणार : मुख्यमंत्री आज उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जाणार

पुणे दिनांक १४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतारवाली सराटी गावात त्यांच्या भेटीला येणार आहेत.काल अचानक पणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार.मंत्री उदय सावंत.राधाकुष्ण पाटील.हे आज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान आज सकाळी मुंबई वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार.मंत्री उदय सावंत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.व शासकीय अधिकारी असे सर्वजण औरंगाबाद येथे विमानतळावर येणार आहेत.व तेथून हेलिकॉप्टर द्वारे राजेश टोपे यांच्या साखर कारखाना प्रर्यत जाणार आहेत.व कारखाना येथून ते कारच्या सहाय्याने अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत.या दौऱ्याबाबत अंत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे.दरम्यान अजित पवार हे या दौऱ्यात असण्या बाबत अनिश्चितता आहे.पण पुण्याचे पालकमंत्री व मराठा समाजाच्या आरक्षणाचा राज्य सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र दौऱ्यात असतील असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.