Crimes : पुण्यातील लाचखोर महसूल विभागातील आय.ए.एस.अधिकाऱ्यांला न्यायालयाचा झटका . २६.जून पर्यत न्यायालयीन कोठडी.

पुणे.दिनांक १७.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )पुण्यातील लाचखोर महसूल विभागातील अधिकारी डाॅ. अनिल रामोड यांची न्यायालयाने २६.जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सदरच्या रवानगी नंतर सी.बी आय. ने देखील कारवाईचा फास आवळला आहे !
महामार्गावरील जमिनीचाभूसंपादनचा वाढीव मोबदला देण्या साठीचा दावा निकाली काढण्या करीता शेतकऱ्यांकडून तब्बल ८ लाख रूपायांची लाच घेतांना अटक झालेले महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांच्या कडून महत्वाची कागदपत्रे सी.बी.आय.कडून तपासा अंती जप्त करण्यात आली असून त्या कागदपत्रांचा सखोल तपास करण्यात येणार आहे.अशी माहीती सी.बी.आय.च्या वतीने.विषेश न्यायालयात सादर केल्यानंतर रामोड यांचा जामीन अर्ज विषेश न्यायालयाने फेटाळला आहे.त्या मुळे त्यांचा न्यायालयीन कोठडीचा मुक्काम आता वाढणार आहे.
दरम्यान रामोड यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी जामीना साठी अर्ज सादर केला होता.त्या अर्जावर सुनवाई होताना. सी. बी.आय.च्या विषेश वकिलांनीन्यायालयात असा युक्तिवाद केला की.आरोपीला जामीनावर सहज सोडल्यस समाजात एक चुकीचा समज जावून सर्व सामान्य जनतेचा विश्वास उडू शकतो. आर्थिक गुन्हेव्यवसथीत हाताळण्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहेत. या गुन्ह्यातील रामोड यांच्याकडून अतीशय महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून या गुन्ह्य़ाचा सखोल तपास करावयाच आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात सी. बी.आय. च्या वतीने म्हणले आहे की.या परिस्थितीत आरोपीस जामीनावर सोडल्यास पुराव्याची छेडछाड व साथीदारांवर प्रेशर टाकला जाण्यची शक्यता आहे.असा युक्तिवाद सी. बी. आय. च्या विषेश वकिलांकडून न्यायालयात करण्यात आल्यानंतर त्यांचा मुद्द ग्राह्य धरून न्यायालयाने रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.व त्यांना २६.जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.डाॅ. रामोड यांच्या घरातून सी.बी.आय.ने.६.कोटी ६४.लाख. रूपये. व त्यांच्या कार्यालयातून १.लाख २८.हजार रूपये. त्या.नंतर सी.बी.आय. ने केलेल्या तपासा मध्ये त्यांच्या आणी कुटुंबांच्या नावावर ५.कोटी ३०.लाख रूपायांची स्थावर मालमत्त आहे.आणी त्याच दृष्टीनेच तपास चालू असल्याचे सी.बी.आय.च्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.