Crimes : अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या चौघां जणांच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.

पुणे.दिनांक १८.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )लोहगाव स्मशान भुमी येथून रात्रीच्य अंधारात रिक्षा घेवून जात असतांना चौघा गुडांनी रिक्षा चालकास जब्बरदस्त मारहाण करून लुटणाऱ्या प्रकरणी पोलीसांकडून चौघा जणांच्या पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ४.च्या पोलिसांनी मुसक्य आवळल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे या प्रमाणे आहेत. १) राहुल राजू थोरात. ( वय .२८.राहणार. विश्वराज हाॅसपीटल जवळ लोणीकाळभोर पुणे. ) २.) अजिंक्य प्रकाश मोहिते. ( वय २८.राहणार पवार वस्ती शिवराज काॅलणी लोहगाव पुणे.) ३.) बबलया उर्फ अजय अशोक कसबे ( राहणार वडार वस्ती विश्रांत वाडी पुणे ).४) अरुण राजू पिल्ले. ( राहणार. संतनगर लोहगाव पुणे ).असे आहेत. सदरच्या घटने बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की. रिक्षा चालक त्याची रिक्षा क्रमांक एमएच १२.जे.एस. ५८८५.ही रात्री च्या वेळेस लोहगाव स्मशान भूमी रोडने जात असतांना चौघा आरोपींनी काठी व लाथा बुक्क्यांचा मार देऊन त्याचा मोबाईल फोन व त्याचीच रिक्षा घेऊन. त्याचे अपहरण करून त्याला पुढे सोडून रिक्षासह फरार झाले होते.या बाबत विमान तळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच अनुषंगानेच तपास चालू होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदार. संजय आढारी. प्रवीण भालचिम. विनोद महाजन. नागेश सिंग कुॅवार. यांच्या पथकाला माहीती मिळाली की रिक्षा चोरीचे आरोपी हे लोहगाव ते खराडी रोडवरील फॉरेस्ट पार्क जवळील नाल्य शेजारी चोरलेल्या रिक्षात बसले आहेत.
त्या नंतर पोलीसांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळविले व त्याच्या सुचने वरून आरोपीच्या मुसक्य आवळल्या यातील दोघेजण अट्टल गुन्हेगार असून ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणी पुढील तपास विमान तळ पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहायक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा. अमोल झेंडे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २.चे सतिश गोवेकर. पोलीस निरीक्षक गणेश माने. यांच्या मार्गदर्शना खाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव. सहाय्यक फौजदार महेंद्र पवार पोलीस अंमलदार. संजय आढारी. प्रवीण भालचिम. विनोद महाजन. नागेशसिंग कुॅवार. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.